'यंदा 'रमजान ईद'ला खरेदीऐवजी कुणाचं घरभाडं भरा, कुणाला किराणा द्या' By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:50 PM 2020-05-18T16:50:23+5:30 2020-05-18T19:24:20+5:30
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी यंदाच्या रमजान ईदला खेरदी करण्याऐवजी गरिबांना मदतीचं आवाहन केलंय
देशात यंदा २५ मे रोजी रमजान ईद साजरी होत आह, मात्र यंदाच्या ईदवर कोरोनाचं सावट आहे
कोरोनामुळे देशात ३१ मे पर्यंत लॉकाडाऊन घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे रमजान ईदला गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत आहे
रमजानचा महिना हा मुस्लीम बांधवांसाठ दसरा-दिवाळीप्रमाणेच असतो. मात्र, यंदा लॉकडाऊन असल्याने ईद साध्या पद्धतीने साजरी होणार आहे
रमजानच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत असते. मुस्लीम बांधव आणि महिलांची खेरदीसाठी झुंबड उडते
बांगड्या, कपडे आणि ज्वेलरी खरेदीसाठी गरीबांपासून ते श्रीमंतांची लगबग पहायला मिळते
हैदराबादमधील चारमिनार येथे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असते, पण यंदा लॉकडाऊनमुळे हे मार्केट बंद राहणार आहे
यंदा २५ मे रोजी चंद्र दिसल्यानंतर ईदची अधिकृत घोषणा होईल, त्यानंतर देशभरात ईद साजरी केली जाईल
कोरोनाच्या महामारीमुळे ईद घरच्याघरीच साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलंय, प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनीही गरिबांना मदत करण्याचं सूचवलंय
लॉकडाऊनमुळे गरीब, मजूर वर्गाचे मोठे हाल होत आहेत, अनेकांना खायला अन्न नाही, तर घराचं भाडं देणंही कठिण बनलंय
म्हणूनच राहत इंदौरी यांनी ईदची खरेदी करण्याऐवजी आजारी लोकांना मदत करा, कुणाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवा
कुणाचं घरभाडं भरा तर कुणाला किराणा भरुन द्या, असं आवाहन राहत इंदौरी यांनी केलंय. आम्हीही तसंच करत आहोत, तुम्हीही तेच करा असे त्यांनी म्हटलंय