interesting facts about Indian Railways
भारतीय रेल्वेबद्दलच्या 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 04:02 PM2018-05-03T16:02:32+5:302018-05-03T16:02:32+5:30Join usJoin usNext त्रिवेंद्रम-निझामुद्दीन एक्स्प्रेस एकही थांबा न घेता सर्वाधिक अंतर कापणारी एक्स्प्रेस आहे. ही एक्स्प्रेस नॉन स्टॉप 528 किलोमीटर अंतर कापते. ही एक्स्प्रेस वडोदरा ते कोटा हे अंतर कापते. नवापूर हे एकमेव रेल्वे स्थानक दोन राज्यांमध्ये येतं. हे स्थानक महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये येतं. या रेल्वे स्थानकाचा निम्मा भाग महाराष्ट्रात आहे, तर निम्मा भाग गुजरातमध्ये येतो. चेन्नईतील एका रेल्वे स्थानकाचं नाव इतकं मोठं आहे की ते नाव उच्चारता उच्चारता एक्स्प्रेस निघून जाईल. या रेल्वे स्थानकाचं नाव आहे व्यंकटनरसिम्हाराजूवरीपेटा. भारतीय रेल्वेगाड्या नेहमीच उशिरा येतात, अशी अनेकांची तक्रार असते. भारतात सर्वाधिक लेट होणारी एक्स्प्रेस तुम्हाला माहितीय का? गुवाहाटी-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस सर्वाधिक लेट असते. ही एक्स्प्रेस साधारणत: 10 ते 12 तास उशिरा धावते. भारतीय रेल्वेत 1.54 मिलियन कर्मचारी आहेत. फोर्ब्सनुसार, सर्वाधिक लोकांना रोजगार देणारी ही जगातील सातव्या क्रमांकाची संस्था आहे. टॅग्स :भारतीय रेल्वेIndian Railway