International Kite Festival : in ahmedabad 45 countries people came to attend this fest
International Kite Festival : काय पो छे ! पतंग महोत्सवात 45 देशांतील नागरिकांचा सहभाग By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 03:29 PM2019-01-11T15:29:51+5:302019-01-11T15:37:35+5:30Join usJoin usNext अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची सध्या धूम सुरू आहे. जगभरातील पर्यटक या पतंग महोत्सवात सहभागी झाले आहेत. 45 देशांतील नागरिक आणि भारताच्या 13 राज्यांतील लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विटरवर महोत्सवाचे फोटोदेखील शेअर केले आहेत. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव हा गुजरात राज्याची ओळख बनला आहे, असे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सांगितले. पतंग बनवणाऱ्या लोकांना या महोत्सवाद्वारे आर्थिक मदत करण्यात येत आहे. मकर संक्रांती सणात पतंग उडवण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर, गुजरातमध्ये बरेच दिवस आधीच पतंगबाजी उत्सवाला सुरुवात होते. पंतगबाजीचा उत्सव वेगवेगळ्या समुदांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करतो असे गुजरातचे राज्यपाल कोहली यांनी म्हटलंय. अमेरिका, ब्रिटन, कंबोडिया आणि नेपाळसहीत अन्य देशांतील नागरिकांनीही उत्सवात सहभाग नोंदवल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. भारतीय कलाकारांनी गुजरातमधील पारंपरिक वेशभूषा परिधान करत ढोल-ताशांच्या गजरात या महोत्सवाचा शुभारंभ केला. पतंगबाजीचे ही आकर्षक दृश्य तुम्हालादेखील महोत्सवात सहभागी होण्यास भाग पाडतील. महोत्सवात मोठ-मोठे पतंग समूह बनवून आकाशात उडवले जातात पतंग महोत्सवात सहभागी झालेले परदेशी नागरिक टॅग्स :पतंगगुजरातमकर संक्रांतीkiteGujaratMakar Sankranti