International Yoga Day 2021 : १८ हजार फूट उंचीवर जवानांनी केला योगा, फोटो बघून कराल सलाम By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:51 AM 2021-06-21T11:51:23+5:30 2021-06-21T11:59:44+5:30
International Yoga Day 2021 : लडाखच्या पॅंगोंग त्सो सरोवराजवळ भारत-तिबेट सीमेवरील जवानांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त एकत्र जमत योगा केला. येथील तापमान फार कमी असतानाही त्यांनी योगा केला. आज संपूर्ण जगात सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2021) साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांशी संवाद साधला आणि जीवनातील योगाचं महत्व सांगितलं. आता देश-विदेशातील लोक सोशल मीडियावर योगा करतानाचे फोटो शेअर करत आहेत. यात सेनेचे जवानही मागे नाहीत. वेगवेगळ्या सीमांवर उभ्या असलेल्या जवानांनीही योग केला.
लडाखच्या पॅंगोंग त्सो सरोवराजवळ भारत-तिबेट सीमेवरील जवानांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त एकत्र जमत योगा केला. येथील तापमान फार कमी असतानाही त्यांनी योगा केला.
तसेच जैसलमेल शाहगढमधील सीमेवरही BSF सेक्टर साउथचे डीआयजी आनंद सिंह तकसत यांच्या मार्गदर्शनात BSF जवानांनी उंटांसोबत योगा केला.
तर अरूणाचल प्रदेशात तैनात ITBP चे जवानही मागे नाहीत. जवानांनी लोहितपूर अॅनिमल ट्रेनिंग स्कूलमध्ये एकत्र योगा केला. यादरम्यान काही जवानांनी घोड्यावर उभे राहून योगा केला.
हा फोटो आहे लडाखमधील जिथे ITBP जवानांनी १८ हजार फूट उंचीवर गोठवणाऱ्या थंडीत योगा केला.
लडाखच्या उंच पर्वतांवर नेहमीच तापमान मायनस डिग्री असतं. अशात जवानांनी योगा डे निमित्त योगा करत आपली इच्छाशक्ती किती मजबूत आहे हे दाखवून दिलं.