International Yoga Day : कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी केली योगासने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 08:27 AM2019-06-21T08:27:57+5:302019-06-21T08:35:50+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकांनीही योगाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगासने केली.

10 अंश सेल्सिअसमध्ये भारतीय जवान योगा साजरा करताना

भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस सुमेधा या नौकेवर योगा करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला.

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी अरुणाचलमधील प्रशिक्षित प्राण्यांसोबत केला योगा

घोड्यावर बसून जवानाने दाखविली योगा प्रात्यक्षिके.

सिक्कीमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी ओपी दार्जिलाजवळ 19 हजार फूटांवर जाऊन 15 अंश सेल्सिअस तापमानात योग केला.

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी नदीमध्ये उभं राहून योगा केला.