IRCTC Ramayana Circuit Train: अत्याधुनिक सुविधा, लायब्ररी, डायनिंग कारसह करा ‘श्री रामायण यात्रा’; नव्या ट्रेनची झलक पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 16:32 IST2021-11-07T16:32:04+5:302021-11-07T16:32:04+5:30

IRCTC Ramayana Circuit Train: IRCTC ने देखो अपना देश कार्यक्रमांतर्गत श्री रामायण यात्रा सुरू केली आहे.

IRCTC ने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी श्री रामायण यात्रेची योजना आखली असून, रविवार, ०७ नोव्हेंबरपासून ही यात्रा सुरू करण्यात येत आहे. दिल्ली सफदरजंग रेल्वे स्टेशनपासून प्रवास सुरू होईल आणि प्रभू रामाच्या जीवनाशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणे या यात्रेदरम्यान दाखवली जाणार आहेत.