ISRO Successfully Launches Earth Observation Satellite RISAT-2B
पाकिस्तानचे कंबरडे मोडणार; आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 10:46 AM2019-05-22T10:46:15+5:302019-05-22T10:51:30+5:30Join usJoin usNext श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या उड्डाणाची २५ तासांची उलटगिणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली होती. हा सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा हा उपग्रह आहे. पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम असून, सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर १५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडला गेला. हा उपग्रह गुप्त निगराणी, कृषी, वन व आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांत मोलाची मदत करणार आहे. इस्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली. तसेच या मोहिमेबाबत जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. आरआयसॅट-२बी हा उपग्रह २००९ मध्ये प्रक्षेपित केलेल्या आरआयसॅट-२ या उपग्रहाची जागा घेईल. नवा उपग्रह पृथ्वीची छायाचित्रे दिवसा आणि रात्रीही घेऊ शकणार आहे. तसेच ढगाळ हवामानांच्या स्थितीतही उपग्रह आपले काम चोख बजावणार आहे. या उपग्रहाचे आयुष्य पाच वर्षांचे आहे व ते लष्करी निगराणीसाठीही काम करणार आहे. सध्याचा आरआयसॅट-२ उपग्रह हाही सीमावर्ती भागावर बारीक नजर ठेवून होता व पाकिस्तानच्या संभाव्य घुसखोरीची खबर देत होता.टॅग्स :इस्रोisro