एकाचवेळी 8 उपग्रह प्रक्षेपित 26 सप्टेंबर 2016 : इस्त्रोने पीएसएलव्ही-सी 35 या प्रक्षेपकाव्दारे एकाचवेळी आठ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केलेएकाचवेळी 20 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण 22 जून 2016 : इस्त्रोकडून एकाचवेळी 20 उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी 34 या प्रक्षेपकाव्दारे प्रक्षेपण23 मे 2016 : इस्रोने तयार केलेल्या ‘आरएलव्ही-टीडी’ या अवकाशयानाचे (स्पेस शटल) यशस्वी प्रक्षेपणजीएसएलव्ही मार्क-3 18 डिसेंबर 2014 रोजी भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही मार्क-3 यानाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपकाची वजन वाहून नेण्याची क्षमता सुमारे चार हजार किलोग्रॅम एवढी आहे.मंगळमोहीम 24 सप्टेंबर 2014 : भारताच्या यशस्वी मंगळ मोहीमने देशाचे नाव जगाच्या नकाशावर चमकवले. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. भारतापूर्वी अमेरिका रशिया आणि युरोपियन युनियन या देशांनी मंगळ मोहीम यशस्वीपणे राबवली.चंद्रयान 2008 मधील इस्रोने चंद्रयान बनवून इतिहास रचला होता. चंद्रयान हे इस्त्रोच्या चंद्रावरील मोहिमेचे नाव. या मोहिमेचे चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 असे दोन टप्पे. 22 ऑक्टोबर 2008 मध्ये चंद्रयान 1 हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर पाठवण्यात आले होते.इस्रोनं 1990 मध्ये धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (PSLV) विकसित केले. यानंतर 1993 मध्ये या प्रक्षेपकाद्वारे पहिला उपग्रह कक्षेत पाठवण्यात आला. यापूर्वी ही सुविधा केवळ रशियाकडे होती.भारताचा ‘104 का दम’ इस्त्रोचा विश्वविक्रम 15 फेब्रुवारी 2017 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.