It is celebrated across the country, Panchami, because what is the reason for reading
देशभरात अशी साजरी होते वंसत पंचमी, वाचा काय आहे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 10:46 PM2018-01-22T22:46:43+5:302018-01-22T23:57:23+5:30Join usJoin usNext आज (22 जानेवारी, सोमवार) वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी केवळ धार्मिकच नाही तर वास्तूच्या दृष्टीकोनातूनही खास मानली जाते माघ मासातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमीचे पर्व मानले जाते. यादिवशी ज्ञानदेवता म्हणजे माता सरस्वतीची पूजा केली जाते. देशभरात वसंत पंचमी साजरी केली जाते. हे पर्व साजरे करण्यामागे अनेक धार्मिक कथा. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबात सुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते.