PHOTOS: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची एकुलती एक लेक; बँकेत करते जॉब, शपथविधीला आली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:59 PM2022-07-25T16:59:57+5:302022-07-25T17:11:17+5:30

Droupadi Murmu Daughter Itishri Murmu : द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पुढील ५ वर्षांसाठी राष्ट्रपती भवन हेच ​​त्यांचे घर आणि कार्यालय असेल. सोमवारी त्यांनी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी द्रौपदी मुर्मूंचे जवळचे नातेवाईकही उपस्थित होते. त्यात त्यांची मुलगी इतिश्री मुर्मू देखील उपस्थित होती. राष्ट्रपतीपदाची शपथ घेऊन आपली आई देशाची सर्वोच्च नागरिक कशी झाली हे मुलीनं याची देही याची डोळा पाहिले.

द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला मुर्मू यांची कन्या इतिश्री मुर्मू देखील उपस्थित होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाची जबाबदारी स्वीकारली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी द्रौपदी मुर्मूंच्या जवळच्या मैत्रिणींसह मुलगी इतिश्री मुर्मू यांच्यासोबत होत्या.

द्रौपदी मुर्मूचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत खडतर आणि शोकाकुल राहिलं आहे. त्यांनी आपल्या पती, दोन मुलगे आणि एक मुलगी खूप पूर्वी गमावली होती. आता त्यांना एकुलती एक मुलगी इतिश्री मुर्मू आहे. जी ओडिशातील भुवनेश्वर येथे राहते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतिश्री मुर्मू सध्या ओडिशातील एका बँकेत नोकरी करतात.

द्रौपदी मुर्मू यांची मुलगी इतिश्री हिचा विवाह गणेश हेम्ब्रम यांच्याशी झाला आहे. सोमवारी द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांची मुलगी इतिश्री या खास क्षणाची साक्षीदार बनली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त केले. यादरम्यान त्या पंतप्रधान मोदींसमोर आल्या तेव्हा पंतप्रधानांनीही हात जोडून त्यांना अभिवादन केलं आणि अभिनंदन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी हे दोघेही शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. एक वेळ अशी आली की दोन्ही नेते आमने-सामने आले. दोघांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केलं. यात मध्येच मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेते देखीलसोबत होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप दिला. यावेळी कोविंद यांचे नातेवाईक देखील उपस्थित होते.

सोनिया गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशींनी पुढाकार घेतला. दिग्गज नेत्यांमध्ये काहीवेळ गप्पा रंगल्या.

अमित शहा आणि नरेंद्रसिंग तोमर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हलक्याफुकल्या वातावरणात गप्पा मारताना दिसले.

देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक खासदारही आवर्जुन उपस्थित होते.