हैदराबादमध्ये उद्योजकांचं संमेलन, इव्हांका ट्रम्प भारतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 15:51 IST2017-11-28T15:40:35+5:302017-11-28T15:51:40+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये अर्थात जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहे.

जीईएसचं पहिल्यांदाच दक्षिण आशियामध्ये आयोजन होत असून भारत या परिषदेचं यजमानपद भूषवत आहे.

या परिषदेत इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करेल, तर पंतप्रधान मोदी भारताचं नेतृत्व करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करतील. यंदा या परिषदेचा विषय ‘वुमेन फर्स्ट, प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल’ असा आहे.