Jammu-Kashmir: The Mughal Road closed due to snowfall
जम्मू-काश्मीर : हिमवृष्टीमुळे मुघल रोड बंद By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 09:44 PM2018-12-10T21:44:51+5:302018-12-10T22:34:08+5:30Join usJoin usNext जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. थंडीपासून संरक्षणासाठी लोक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह असून बर्फात खेळण्याचा ते आनंद ते लूटत आहेत. राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. टॅग्स :जम्मू-काश्मीरJammu Kashmir