कलम 370 हटवल्यानंतर भाजपाचा 'हा' चेहरा आला समोर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:49 PM 2019-08-09T13:49:15+5:30 2019-08-09T13:52:47+5:30
लडाखमधील भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांचे भाषण ऐकावं म्हणून लोकांना आवाहन केलं. 34 वर्षीय सेरिंग नामग्याल हे लडाख लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. कलम 370 हटवल्यानंतर त्यांनी दिलेले लोकसभेतील भाषण व्हायरल होत आहे.
जामयांग सेरिंग नामग्याल हे सर्वसामान्य कुटुंबातून येतात, त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1985 मध्ये लेहमधील एका गावात झाला.
सेरिंग यांचे वडील मिलिट्री इंजिनिअर सर्व्हिसमध्ये कारपेंटर म्हणून काम करत होते. तर आई गृहिणी होती.
सेरिंग हे जम्मू विश्वविद्यालयातून बीए उत्तीर्ण झाले आहेत. तर विद्यार्थी दशेपासून ते राजकारणात सक्रीय आहेत.
वर्ष 2012 मध्ये सेरिंग यांनी लेह येथील भाजपा कार्यालय प्रमुख म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी ते ज्या लोकांना लिहिता-वाचता येत नाही अशांसाठी पत्र लिहून देण्याचं काम करत होते.
2014 च्या स्थानिक निवडणुकीत भाजपा उमेदवार थूपस्तान चवांग यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला होता. चवांग हे 36 मतांनी विजय झाला होता.
2019 मध्ये भाजपाने जामयांग सेरिंग यांना उमेदवारी दिली. लडाख मतदारसंघातून निवडून येत त्यांनी अनेकांना आश्चर्यचकीत केलं.