जितेगा भाई जितेगा, विकास ही जितेगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 22:20 IST2017-12-18T22:18:31+5:302017-12-18T22:20:47+5:30

नवी दिल्ली - गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये जनतेने दिलेला कौल हा विकासाला दिलेला कौल आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयानंतर नवी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या कुशलतेची प्रशंसा केली. तसेच, त्यांच्या कुशल रणनितीने कॉंग्रेसला मात दिली आहे, असे ते म्हणाले.

जीएसटी लागू केल्यावर विरोधक भाजपच्या पराभवाबाबत बोलत होते. पण विधानसभा निवडणुकीत मिळालेला हा विजय दर्शवतो की, जनतेला विकास हवा आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी 'जितेगा भाई जितेगा, विकास ही जितेगा' अशी घोषणाही त्यांनी दिली.

दरम्यान, गुजरातमध्ये भाजपाने 99 जागांवर विजय मिळविला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये 44 जागा जिंकल्या आहेत.