JOB Alert : इंजिनिअर्ससाठी खूशखबर! HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज? By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:43 PM 2021-03-18T12:43:37+5:30 2021-03-18T13:01:22+5:30
HPCL Engineer Vacancy 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजिनिअर्ससाठी एक खूशखबर आहे. HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांचे उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून ते बेरोजगार झाले आहेत. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजिनिअर्ससाठी एक खूशखबर आहे. HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे. कसा अन् कुठे करायचा अर्ज? हे जाणून घेऊया...
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) इंजिनिअर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. एकूण 200 पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. 3 मार्चला नोटिफिकेशन जारी केले असून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्यास इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईट hindustanpetroleum.com वर जावं. 15 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर लिंक वेबसाईटवरुन हटवली जाणार आहे.
पदांची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमनं इंजिनिअरिंगच्या 200 जागासांठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 120, सिव्हील इंजिनिअरसाठी 30, इलेक्ट्रिकल इंजिनिअर 25 आणि इंन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरसाठी 25 जागा आहेत.
निवड करण्यात आलेल्या लोकांना हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे उमेदवारांनी अधिक माहितीसाठी एचपीसीएलच्या वेबसाईटला अधिक माहितीसाठी भेट द्यावी.
अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या अधिकृत वेबसाईटवर जा.होम पेजवर Career सेक्शनमध्ये जावा. तिथे View Available Positions या लिंक पर क्लिक करा.
Our Current Openings वर जा. पुढे Engineering Roles च्या समोरील ‘Click here to apply” लिंक वर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा, अर्जाची फी भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.
अर्ज कोण करू शकतं? मेकॅनिकल इंजिनिअर, सिव्हील इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि इंन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. यावेळी सोनू बेरोजगारांच्या मदतीला धावून आला असून त्यांच्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 कोटी लोकांचं आयुष्य बदलणार आहे.
सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा एक महत्त्वकांक्षी प्लॅन लोकांसोबत शेअर केला आहे. तो आता एक लाख लोकांना नोकरी देण्यासाठी एक प्लॅन आखत आहे. त्याच्या या ट्वीटमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
गुडवर्कर अॅप हे एक नोकरी (Job) मिळवण्यासाठी मदत करणारे अॅप्लिकेशन आहे. देशातील प्रवासी मजुरांना नोकरी मिळवून देण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आलं. बेरोजगार असलेले आणि नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी हे अॅप आहे. लाखो लोकांना जॉब लिंकेज आणि करिअरसाठी मदत करणं हा गुडवर्कर अॅपचा मुख्य उद्देश आहे.
गुडवर्कर हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी http://bit.ly/GoodWorkerApp वर क्लिक करा आणि ते डाऊनलोड करा. या अॅपवर युजर्सना मोफत आपला बायोडेटा तयार आणि शेअर करता येणार आहे. आपल्या भाषेत बायोडेटा तयार केला नंतर त्याचं इंग्रजी भाषेत भाषांतर केलं जाईल. नंतर तो तो कंपन्यांकडे पाठवला जाणार आहे.
जॉब मॅचिंग टूलच्या माध्यमातून योग्य नोकरीची माहिती अर्ज करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तुम्ही ज्या गावात तुम्ही राहात असाल किंवा जिथं नोकरीच्या शोधात असाल त्या ठिकाणच्या नोकऱ्यांबाबत माहिती दिली जाईल. एखाद्या कंपनीत नवीन कामगार भरती होत असेल तर त्याची माहिती हे अॅप देईल. तुमचं राहण्याचं ठिकाण आणि पात्रता यानुसार योग्य नोकऱ्यांची माहिती दिली जाईल.