बँका सोडा...आता थेट आरबीआयमध्येच नोकरीची संधी; मुदतही वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 04:44 PM2020-01-17T16:44:26+5:302020-01-17T16:48:22+5:30

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक असो किंवा गावातील पतसंस्था, यांच्यावर एकच शिखर बँक नियंत्रण ठेवते. ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याच बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आली आहे.

महत्वाचे म्हणजे ही भरती सहाय्यक पदांसाठी आहे. आरबीआयने ऑनलाईन अर्जाची मुदत 20 जानेवारीपर्यंत वाढविली आहे.

ही भरती आरबीआयच्या विविध कार्यालयांसाठी करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारांची कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील कमीतकमी 50 टक्के उत्तीर्ण असलेली पदवी असणे बंधनकारक आहे.

पदाचे नाव सहाय्यक, पदांची संख्या 926 आहे. अर्जदाराचे वय 20 वर्षे आणि जास्तीतजास्त 28 वर्षे आहे.

खुला, ईडब्ल्यूएस आणि ओबीसींसाठी 450 रुपये आणि एससी, एसटी, पीडब्लूडी यांच्यासाठी 50 रुपये शुल्क आहे.

उमेदवाराची निवड ऑनलाईन पूर्व परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि भाषेतील प्राविण्य पाहून केली जाणार आहे.

https://rbidocs.rbi.org.in/rdocs/Content/PDFs/ADVTRPS231220191CA99C7B271B4474ABB2A6813C5B3850.PDF