कमल हासन यांची धडाक्यात राजकीय एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 13:35 IST2018-02-22T13:31:27+5:302018-02-22T13:35:21+5:30

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून आपल्या पक्षाची घोषणा केली आहे.

कमल हासन यांनी आफल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून याचा अर्थ 'लोक न्याय पक्ष' (People Justice Party) असा आहे.

मदुराईमध्ये कमल हासन यांनी बुधवारी पक्ष स्थापनेसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील यावेळी उपस्थित होते.