Kisan Kranti Yatra : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांनी केला बळाचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:23 IST2018-10-02T14:15:32+5:302018-10-02T14:23:32+5:30

हरिद्वारहून नवी दिल्लीपर्यंत भारतीय किसान क्रांती यात्रेनं किसान क्रांती पदयात्रेचे आयोजन केले होते. उत्तर भारतातील अनेक राज्यांतील शेतकरी या यात्रेत सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांचे हे आंदोलन आठ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
कर्जमाफी, उसाला योग्य भाव यासह दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडले आहे.
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. पूर्व दिल्ली आणि गाझियाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.