kisan vikas patra scheme now your investment will double in 120 months open account like this
Kisan Vikas Patra: आता १२० महिन्यात पैसे दुप्पट! पोस्टाच्या 'या' योजनेचे १ जानेवारीपासून नियम बदलले, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 08:14 PM2023-01-06T20:14:02+5:302023-01-06T20:20:47+5:30Join usJoin usNext Kisan Vikas Patra Interest Rate: जास्तीत जास्त आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेत पैसे गुंतवण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. तु्म्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सरकारच्या किसान विकास पत्र (KVP) योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आधीच्या तुलनेत आता ही योजना अधिक लाभदायक झाली आहे आणि तुम्ही गुंतवलेली रक्कम योजनेत १२० महिन्यात दुप्पट होऊ शकते. भविष्याच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक रिटर्न्स मिळवण्याचा विचार करत असाल तर पोस्टाची किसान विकास पत्र योजना सर्वात लोकप्रिय आहे. सरकारनंही नुकतंच या योजनेच्या व्याज दरात वाढ केली आहे. केंद्रानं स्मॉल सेविंग स्कीमवर मिळणाऱ्या इंटरेस्ट रेटमध्ये १.१० टक्क्यांची वाढ केली आहे. याअंतर्गत किसान विकास पत्रच्या व्याजदरात २० बेसिस पॉइंटमध्ये वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांचे पैसे आधीच्या तुलनेत तीन महिने आधीच दुप्पट होणार आहेत. केंद्राच्या घोषणेनंतर इतका व्याज दर केंद्र सरकारनं १ जानेवारी २०२३ पासून किसान विकास पत्र योजनेतील केलेल्या बदलामुळे योजनेत गुंतवलेला पैसा १२३ महिन्यांऐवजी १२० महिन्यात डबल होणार आहे. व्याजदरातील वाढीनंतर किसान विकास पत्र गुंतवणुकीवर ७.२० टक्के व्याज मिळणार आहे. व्याज दरात वाढीआधी गुंतवणूदारांना १२३ महिन्यात ७ टक्के व्याज मिळत होतं. नव्या बदलानुसार मॅच्युरिटी आता १० वर्षात होणार आहे. १ हजार रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक पोस्ट ऑफीसच्या किसान विकास पत्र स्कीममध्ये अवघ्या १ हजार रुपयांपासून सुरुवात करू शकता. यानंतर १०० रुपयांच्या गुणोत्तरात गुंतवणूक करू शकता. यात गुंतवणुकीची कमाल मर्यादेला कोणतीही सीमा नाही. या अंतर्गत सिंगल आणि ज्वाइंट अकाऊंट सुरू केलं जाऊ शकतं. तसंच गुंतवणूकदाराला नॉमिनीची सुविधा देखील मिळते. कसं सुरू कराल खातं? किसान विकास पत्र योजनेत १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचंही खातं सुरू करता येऊ शकतं. अर्थात त्यांच्यावतीनं कुणीतरी वयस्क व्यक्तीला खातं उघडावं लागेल आणि खातेधारकाचं वय १० वर्ष झालं की खातं त्याच्या नावावर ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. यात अकाऊंट सुरू करणं खूप सोपं काम आहे. पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन डिपॉजिट पावतीसह अर्ज दाखल करावा लागेल आणि गुंतवणुकीची रक्कम, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्यावा लागेल. यात तुम्हाला अर्जासोबत ओळखपत्र देखील जोडावं लागेल. अर्ज आणि पैसे जमा करताच तुम्हाला किसान विकास पत्र योजनेचं सर्टिफिकेट मिळून जाईल. टॅग्स :व्यवसायपोस्ट ऑफिसbusinessPost Office