Kite Flying License: काय सांगता? भारतात पतंगबाजीवर बंदी आहे; दहा लाखांचा दंड, दोन वर्षांचा तुरुंगवास By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:34 PM 2022-01-14T13:34:52+5:30 2022-01-14T13:40:18+5:30
Makar Sankranti Kite flying Festival: संक्रांत म्हणजे सणाबरोबरच पतंग उडविण्याची मज्जा. परंतू आपल्या देशात पतंग उडविण्यावर केंद्र सरकारचीच बंदी आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नाहीय. पण हे खरे आहे. संक्रांत म्हणजे सणाबरोबरच पतंग उडविण्याची मज्जा. सध्या पतंगबाजी ही चिनी मांज्यामुळे बदनाम आहे. कोणाचा गळा चिरला जातो, पक्षांना मृत्यूमुखी पडावे लागते, गंभीर इजा होते, आदी बातम्या येत असतात. परंतू आपल्या देशात पतंग उडविण्यावर केंद्र सरकारचीच बंदी आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नाहीय. पण हे खरे आहे. लायसन मिळालेलाच व्यक्ती पतंग उडवू शकतो, नाहीतर कायदा मोडणाऱ्याला दंड आणि शिक्षाच खूप मोठी होऊ शकते.
पतंगबाजी हा अनेकांचा शौक असतो. तो संक्रांतीलाच नाही तर त्यानंतर कित्येक दिवस सुरु असतो. पण हाच शौक तुम्हाला तुरुंगातही पाठवू शकतो. ऐकायला तुम्हाला विचित्र वाटत असेल परंतू हे खरे आहे. केंद्राचा कायदा असला तरी तो क्षेत्र आणि राज्याराज्यांवर वेगवेगळ्या क्षमतेने लागू आहे.
भारतात पतंग उडविणे बेकायदा आहे. इंडियन एयरक्राफ्ट एक्ट 1934 नुसार पतंगबाजीवर बंदी आहे. या कायद्यानुसार पतंग, फुगे उडविण्यावर प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. भारतीय विमान अधिनियम कलम ११ नुसार दोन वर्षांची शिक्षा आणि १० लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. या कायद्यात २००८ मध्ये संशोधन करण्यात आले आहे. परंतू पतंगबाजीच्या शौकिनांसाठी लायसनची सोयही करण्यात आली आहे. हे लायसन मिळल्यावरच तो व्यक्ती पतंग उडवू शकतो.
पतंग म्हणजे विमान कुठेय? पतंग हे जरी विमान नसले तरी कायद्यातील तरतुदीनुसार जे यंत्र किंवा वस्तू हवेच्या दाबाने उडते किंवा पुढे सरकते ते सर्व या व्याख्येत येत. बांधलेले किंवा सोडलेले फुगे, ग्लायडर, पतंग, एअरशिप, फ्लाईंग मशीन आदी सर्व या प्रकारात मोडते. आकाशात सोडले जाणारे कंदीलदेखील यात येतात. आता हा कायदा कसा आणि कुठे वापरला जातो, ते सांगणे कठीण आहे. कारण लाखो लोक पतंग उडवितात, परंतू ते काही तुरुंगात गेलेल्याचे ऐकिवात नाही.
पतंग उडवण्याचा परवाना कसा मिळवायचा?
भारतीय कायद्यानुसार, देशात पतंग उडवण्यासाठी तुम्हाला विशेष परवाना घ्यावा लागतो. याबाबत काहीसा संभ्रम आहे. कारण काही राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये स्थानिक पोलिस स्टेशनमधून परवाना मिळू शकतो तर काही ठिकाणी तो फक्त भारतीय नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मिळू शकतो.
देशात जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणावर पतंग महोत्सव, बलून फेस्टिव्हल, हॉट एअर बलून फेस्टिव्हल आणि ग्लायडर फ्लाइंग इव्हेंट होतात तेव्हा स्थानिक पोलिस स्टेशन, प्रशासन आणि भारतीय नागरी उड्डाण प्राधिकरण यांच्याकडूनही परवानगी आवश्यक असते.