आंतरराष्ट्रीय पतंगोत्सवाच्या निमित्तानं 44 देशांमधील पतंगबाज पोहोचले गुजरातेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 21:25 IST2018-01-08T21:14:43+5:302018-01-08T21:25:52+5:30

साबरमती रिव्हरफ्रंटच्या किना-यावरील एनआयडी मैदानावर 29व्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं
7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत हा पतंग महोत्सव चालणार आहे.
या पतंगोत्सवात जवळपास 44 देशांतील पतंगबाजांनी सहभाग नोंदवला आहे.
रविवारी राज्यपाल ओपी कोहली आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना या पतंग महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे.
साबरमतीच्या किना-यावरील आकाशात अनेक मोठमोठ्या आणि रंगीबेरंगी पतंग पाहायला मिळतायत.
या पतंगोत्सवामुळे 2 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे.