Indian Railways : ट्रेनच्या लाल आणि निळ्या कोचमध्ये काय असतो फरक? प्रत्येक रंगाची आहे काही निराळी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:51 PM2022-04-18T14:51:29+5:302022-04-18T15:17:20+5:30

Indian Railways : जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुमच्या तुमच्या डोक्यात रंगांबाबत प्रश्न आलाच असेल. अनेक ट्रेनमध्ये हे डबे लाल आणि निळ्या रंगाचे का असतात? पाहा कारण…

Different Colour Train Coaches: रेल्वे हा भारताच्या वाहतूक व्यवस्थेचा सर्वात मोठा भाग आहे. आपण असे म्हणू शकतो की कदाचित रेल्वेशिवाय वाहतूक व्यवस्थेचा विचार करणंच अशक्य आहे. अशा स्थितीत रेल्वे ही एखाद्या पुस्तकापेक्षा किंवा एका अध्यायापेक्षा कमी नाही.

सहसा तुम्ही जेव्हा कधी ट्रेनने प्रवास करता तेव्हा डब्यांच्या डब्यांचा रंग वेगळा का हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. अनेक गाड्यांमध्ये लाल आणि निळ्या रंगाचे डबे असतात. तसंच हा रंग वेगळा का असतो याचा अर्थ काय असतो. जाणून घेऊया या रेल्वे कोचच्या वेगवेगळ्या डब्यांच्या रंगाची कहाणी...

सर्व प्रथम आपण निळ्या कोचबद्दल बोलूया. निळ्या कोचला इंटिग्रल कोच म्हणतात. म्हणजेच ICF. हे भारतात तयार होणाऱ्या सर्वात जुन्या डब्यांपैकी एक आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरीची निर्मिती लोखंडापासून होते, त्यामुळे त्याचे वजन जास्त आहे.

यामध्ये जनरल, एसी, स्लीपर, डेमू आणि मेमू कोचचा समावेश आहे. जर आपण त्याच्या वेगाबद्दल बोललो तर त्याची कमाल वेग ताशी १२० किलोमीटर आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चेन्नई येथे आहे आणि त्याची स्थापना १९५२ साली झाली.

आता आपण लाल रंगाच्या कोचबद्दल जाणून घेऊ. त्याला एलएचबी इंटिग्रल कोच (Linke Hofmann Busch) म्हणतात. या कोचचे उत्पादन युनिट कपूरथळा येथे आहे. वास्तविक हे डबे जर्मनीमध्ये बनवले गेले होते, जे २००० मध्ये जर्मनीतून भारतात आणण्यात आले. तेव्हापासून हे लाल रंगाचे डबे पंजाबमधील कपूरथला येथे बनवले जात आहेत.

हे डबे प्रत्यक्षात अॅल्युमिनियमचे बनलेले आहेत आणि ते ICF पेक्षा खूपच हलके आहेत. त्याच वेळी, जर आपण त्याच्या वेगाबद्दल सांगायचं झाल्यास तर त्याचा कमाल वेग ताशी 200 किलोमीटर आहे. म्हणजेच हे डबे हायस्पीड ट्रेनसाठी वापरले जातात.

याशिवाय काही रिजनल रेल्वेदेखील देखील आहेत. त्यांच्या डब्यांची निराळी ओळख आहे. मध्य रेल्वेबाबत बोलायचं झालं तर काही गाड्यांमधील डब्यांचा रंग पाढरा, निळा आणि लाल असा असतो. याशिवाय गरीब रथ रेल्वेमध्ये हिरव्या रंगाचे डेबे वापरले जातात.