know about top reachest person in the world
बिल गेट्स नाही तर ही व्यक्ती आहे दुनियेतील सर्वात श्रीमंत, जाणून घ्या अंबानी कुठल्या स्थानी By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 11:50 AM2018-03-07T11:50:56+5:302018-03-07T14:43:44+5:30Join usJoin usNext ब्लूमबर्ग आणि फोर्ब्स दोघांनी या वर्षी आपल्या अरबपती व्यक्तींच्या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांना सगळ्यात वरचं स्थान दिलं आहे. फोर्ब्सने बेझोस यांची संपत्ती 112 बिलियन डॉलर नमूद केली आहे. याआधी हा रेकॉर्ड मायक्रोसॉफ्टचे संस्थानपक बिल गेट्स यांच्या नावे होते. बिल गेट्स अजूनही सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. बिले गेट्स यांची संपत्ती जवळपास 90 बिलियन डॉलर आहे. तिसऱ्या नावावर वॉरेन बफेच आहे. बर्कशायर हाथवेचे सीईओ बफेट यांची एकुण संपत्ती 87 बिलियन डॉलर आहे. चौथ्या स्थानी बर्नार्ड अरनॉल्ट आणि त्यांचं परिवार आहे. ते LVMH Moet Hennessy Louis Vuitton चे चेअरमॅन व सीईओ आहेत. त्यांची एकुण संपत्ती 75 बिलियन डॉलर आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकर्सबर्ग पाचव्या स्थानी आहे. त्यांची एकुण संपत्ती 72 बिलियन डॉलर आहे. अमानसिओ ओर्टेगा नावाची व्यक्ती सहाव्या स्थानी आहे. त्यांची एकुण संपत्ती 66.2 बिलियन डॉलर आहे. कार्लोस स्लिम हेलू आणि त्यांचं परिवार या यादीच सातव्या स्थानी असून त्यांची संपत्ती 68 बिलियन डॉलर आहे 8 व्या क्रमांकावर चार्ल्स कोच आहे. कोच इंडस्ट्रिजचे सीईओ चार्ल्स यांची संपत्ती 60 बिलियन डॉलर आहे. डेव्हिड कोच नवव्या स्थानी असून त्यांची संपत्ती 60 बिलियन इतकी आहे. लॅरी एलिसन ओरेकल यांनीही फोर्ब्सच्या यादीत नाव ठेवलं आहे. त्यांची संपत्ती एकुण 62 बिलियन डॉलर आहे. 40 बिलियन डॉलक एकुण संपत्तीसह रिलायन्स इंडस्ट्रिचे अध्यक्ष मुकेश अंबानी दुनियेतील 19 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.