Landing in Dharoi dam of Narendra Modi's Sea Plane
नरेंद्र मोदींच्या सी-प्लेनचे धारोई धरणात लँडिंग By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 10:37 PM2017-12-12T22:37:23+5:302017-12-12T22:42:32+5:30Join usJoin usNext पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजरातमधल्या धारोई धरणात पहिल्यांदाच सी-प्लेन उतरले आहे. मोदी रस्ते मार्गाने अंबाजी मंदिरात दर्शनासाठी निघाले असताना अहमदाबादच्या साबरमती नदीमधून सी प्लेनने धारोईला उतरले होते. जलमार्ग विकसित करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते लक्षात आणून देणे हा मोदींचा सी प्लेन प्रवासामागचा उद्देश आहे. प्रत्येक ठिकाणी विमानतळ उपलब्ध होऊ शकत नसल्यानं सरकारने सी प्लेन मार्ग विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे मोदी म्हणाले. क्वेस्ट कोडियाक प्रकारचे हे सी प्लेन आहे. एकाच वेळी 9 ते 15 जण या विमानातून प्रवास करू शकतात. उड्डाण आणि लँडिंगसाठी या विमानाला फक्त 300 मीटरची धावपट्टी लागते. विमान पाण्यावर तरंगूही शकते त्यामुळे हे विमान पाण्यातून उड्डाण आणि लँडिंग करू शकते. टॅग्स :नरेंद्र मोदीNarendra Modi