Landslide in Assam's Barak Valley; at least 20 dead, several injured rkp
आसाममध्ये पावसाचा कहर; भूस्खलनामुळे हाहाकार, २० जणांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 05:20 PM2020-06-02T17:20:11+5:302020-06-02T17:34:13+5:30Join usJoin usNext आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे आसाममध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्ती हे प्रामुख्याने दक्षिण आसाममधील बराक घाट भागातील तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. मदत व बचाव कार्य प्रगतीपथावर आहे. भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कछार जिल्ह्यातील सात, हैलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे मंगळवारी बराक घाट येथे भूस्खलन झाले आणि त्यात २० लोकांचा मृत्यू झाला. आसाममधील नागरिकांना आधीच पुराचा फटका बसला आहे आणि सुमारे ३.७२ लाख लोक प्रभावित आहेत. अनेकांनी शिबिरात आश्रय घेतला आहे. या पुराचा सर्वाधिक परिणाम गोलपारा जिल्ह्यात झाला आहे. त्याचबरोबर, नागाव आणि होजाई जिल्ह्यातही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ३४८ गावे पूरामुळे जलमय झाली आहेत.टॅग्स :आसाम पूरआसामAssam FloodAssam