last birthday of life was celebrated a few hours before the accident in rajasthan
...अन् वाढदिवसाचं सेलिब्रेशन अखेरचं ठरलं; भीषण अपघातात कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 03:08 PM2021-01-28T15:08:03+5:302021-01-28T15:10:59+5:30Join usJoin usNext मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातल्या ८ जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत. यातील ६ जणांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. अपघातापूर्वी कुटुंबातील सदस्यांनी एकाचा जन्मदिन साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करून कुटुंब प्रवासाला निघालं. राजस्थानच्या टोंकमध्ये भरधाव ट्रेलरनं कुटुंबीय प्रवास करत असलेल्या जीपला धडक दिली. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला. राजगढच्या जीरापूरमध्ये दोन चुलत भाऊ ललित सोनी आणि पवन सोनी १ जानेवारीला खाटू श्याम पदयात्रेसाठी निघाले. त्यांना तिथून परत आणण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य दोन गाड्या घेऊन खाटू श्यामला पोहोचले. २६ जानेवारीला दर्शन घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंब दोन गाड्यांमधून घरी परतत होतं. त्यावेळी पुढे असलेल्या गाडीला अपघात झाला. टोंक जिल्ह्यातल्या राष्ट्रीय द्रुतगती मार्ग क्रमांक ५२ वर मंगळवारी रात्री गाडीला भीषण अपघात झाला. जयपूरहून येणाऱ्या तुफान गाडीला मागून भरधाव आलेल्या ट्रेलरनं धडक दिली. यात मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ३ पुरुष, २ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना आधी प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात होतं. नंतर त्यांना जयपूरमध्ये हलवण्यात आलं. तुफान गाडीचा चालक आणि एक लहान मुलगी सुखरूप आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून फरार झाला. ट्रेलर चालकानंदेखील तिथून पळ काढला. ट्रेलर आणि तुफान गाडीची धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या. पोलिसांनी क्रेनच्या मदतीनं दोन्ही वाहनं वेगवेगळी करून आठ मृतदेह बाहेर काढले. आठ मृतदेहांपैकी ६ जणांवर बुधवारी जीरापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दोघांवर आज मक्सीमध्ये अंत्यसंस्कार झाले. श्याम खाटूहून परतत असताना काही तासांपूर्वीच कुटुंबातील रामबाबू सोनी यांचा वाढदिवस साजरीा करण्यात आला. त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र होतं. रामबाबू यांचा मुलगा नयननं पुष्पगुच्छ देऊन वडिलांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काही तासांतच झालेल्या अपघातानं होत्याचं नव्हतं केलं.टॅग्स :अपघातAccident