Lata Mangeshkar: लतादीदींना अनोखी श्रद्धांजली, कलाकाराने बाटलीत बंद केली प्रतिकृती By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 08:16 AM 2022-02-12T08:16:20+5:30 2022-02-12T08:45:03+5:30
ओडिशाच्या भुवनेश्वर येथील आर्टीस्ट एल. ईश्वर राव यांनी छोट्याशा बाटलीत लतादीदींची फ्रेम बनवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासाठी, एक काचेचा तुकडा, पेपर आणि चमकता तारा याचा वापर केला. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. लतादीदींच्या निधनानंतर सोशल मीडिया भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवर अनेकांनी त्यांचे फोटो, त्यांच्या व्हिडिओ आणि गाणी शेअर करत आठवणी जागवल्या.
मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानावर लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीहून आले होते. तसेच, अनेक बड्या हस्तींची उपस्थिती दिसून आली.
लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन गुरुवारी (दि. 10) सकाळी रामकुंडानजीकच्या अस्थीविलय कुंडात करण्यात आले. मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले.
लता मंगेशकर यांच्या आठवणी कायम राहव्यात, त्यातून नव्या पिढीने प्रेरणा घ्यावी, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय मुंबईत होणार असल्याचे घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
लतादीदींना विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. नाशिकमध्ये 25 गायकांनी लतादीदींची गाणी गात त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ओडिशाच्या भुवनेश्वर येथील आर्टीस्ट एल. ईश्वर राव यांनी छोट्याशा बाटलीत लतादीदींची फ्रेम बनवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासाठी, एक काचेचा तुकडा, पेपर आणि चमकता तारा याचा वापर केला.
आर्टीस्ट ईश्वर यांनी यापूर्वी अशा अनेक कलाकृती बनविल्या आहेत. बंद बाटलीत एखादी फ्रेम बनविण्याची त्यांची कला प्रसिद्ध आहे. लतादीदींची फ्रेम कलाकृती बनविण्यासाठी त्यांना 4 दिवसांचा कालवधी लागल्याचं त्यांनी म्हटलं.
ईश्वर राव हे ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्याच्या जाटनी गावातील रहिवाशी आहेत. यापूर्वी दुर्गा उत्सव म्हणजे नवरात्रीवेळी त्यांनी दुर्गामातेचीही अशीच कलाकृती बनवली होती.