Leaders 'Yoga', we all 'Yoga Day'
नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे' By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:27 PM2019-06-21T12:27:54+5:302019-06-21T12:44:42+5:30Join usJoin usNext पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील रांची येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला, त्यावेळी केलेलं योगासन हरयाणातील रोहतक येथे केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी योगा दिनानिमित्त योगासने केली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री मनोहर लाल ठक्कर हे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनात योगासन करुन जागतिक योग दिवस साजरा केला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात योगा दिन साजरा केला, यावेळी योग आसन करताना गडकरी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी डोंगरी येथील एका बालकाश्रमात जाऊन तेथील मुलींसमवेत योगासने केली, योगासनाच महत्वही त्यांनी मुलींना पटवून दिलं योग साधना अत्यंत गरजेची असून योगामुळे शरीरासह मनही प्रसन्न राहत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितल. मंत्रालयाच्या आवारातही सकाळीच सनदी अधिकारी, मंत्री आणि कर्मचाऱ्यांनी योगासने करुन योग दिवस साजरा केला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या मार्गदर्शनात गेट वे ऑफ इंडिया येथे योगासने करत योग दिवस साजरा केला. मंत्रालयातील त्रिमूर्ती पटांगणामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योगासने केली, योग दिनाचा उत्साह मंत्रालयातही पाहायला मिळाला मंत्रालयात उपस्थित कर्मचाऱ्यांसमवेत योगा टीचरच्या मार्गदर्शनात विविध आसने करताना, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील नवनिर्वाचित शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीही बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनात विधिमंडळात योगा डे साजरा केला. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी संसदेतील आवारात योग दिनानिमित्त योगासने केली. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक खासदार आणि अधिकारीही हजर होते.टॅग्स :आंतरराष्ट्रीय योग दिनयोगअमित शहादेवेंद्र फडणवीसरावसाहेब दानवेInternational Yoga DayYogaAmit ShahDevendra Fadnavisraosaheb danve