ऑनलाइन लोकमत क्रिकेटपटू, समालोचक, राजकारणी ते अभिनेता असा प्रवास करणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडफाफडकी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. वरील चारही क्षेत्रात सिद्धूंनी आपला प्रभावी ठसा उमटवल्यामुळे देशभरात आज त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. येणा-या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात. तर आपण जाणून घेऊ या सिद्धू यांच्या व्यक्तीगत आणि व्यावसायिक करीयरबद्दल १९६३ पंजाब पतियाळामध्ये नवज्योत सिंग सिद्धूचा जन्म झाला. नवज्योत सिंग सिध्दू यांनी नवज्योत कौर सिद्धू यांच्याबरोबर विवाह केला. त्या डॉक्टर असून, सध्या पंजाब विधानसभेच्या आमदार आहेत. १९८३ यावर्षी सिद्धूने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सिद्धूने डेब्यु केला. १९८८ रस्ते अपघाताच्या वादातून सिद्धू आणि त्याचा सहकारी रुपिंदर सिंगने गुरनाम सिंग (५०) या व्यक्तीला मारहाण केली. गुरनाम सिंग यांना यावेळी ह्दयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सिद्धू यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव राबिया सिद्धू आणि मुलाचे नाव करन सिद्धू आहे. १९९६ कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनबरोबर वाद झाल्यानंतर सिद्धू इंग्लंड दौरा अर्धवट सोडून भारतात निघून आला. १९९९ यावर्षी सिद्धूने त्याच्या दोन दशकाच्या क्रिकेट करीयरला अलविदा केला. त्याने डिसेंबर महिन्यात निवृत्तीची घोषणा केली. टोरांटोमध्ये पाकिस्तान विरुद्ध सिद्धू शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सप्टेंबर महिन्यात पतियाला सत्र न्यायालयाने १९८८ सालच्या रोड रेज हत्या प्रकरणात सिद्धूची निर्दोष मुक्तता केली. सिद्धू यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एचआर कॉलेजमधून पूर्ण केले. २००१ यावर्षी भारताच्या श्रीलंका दौ-यात समालोचक म्हणून सिद्धूने करीयरच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. २००४ सिद्धूने २००४ साली भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक लढवण्यापूर्वी सिद्धूने स्टेट बँक ऑफ पतियालाच्या पब्लिक रिलेशन मॅनेजरपदाचा राजीनामा दिला. अमृतरसमधून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर जवळपास एक दशक खासदारकी भूषवली. १९९६ साली वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी ९३ धावांची खेळी करुन भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. २००६ डिसेंबर महिन्यात पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने सिद्धू आणि त्याचा सहकारी साधूला कलम ३०२ अंतर्गत एका हत्या प्रकरणात सिद्धूला दोषी ठरवले. सिद्धूला तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सिद्धूने खासदारकीचा राजीनामा दिला होता. सिध्दू यांनी मुझसे शादी करोगी या हिंदी चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. २००७ १९८८ सालच्या एका हत्या प्रकरणात २००६ मध्ये न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवले होते. त्यामुळे सिद्धूला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर अमृतसर मतदारसंघातून सिद्धूने पोटनिवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकून सिद्धू पुन्हा लोकसभेवर गेले. त्यांनी काँग्रेस उमेदवार एस.एस.सिंगला यांचा ७७ हजार मतांनी पराभव केला. २०१४ अमृतसर लोकसभा मतदारसंघातून सलग १० वर्षे लोकसभेवर निवडून गेलेल्या सिद्धू यांनी २०१४ मध्ये अरुण जेटली यांच्यासाठी अमृतसरची जागा सोडली. सुरक्षित मतदारसंघ असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यासाठी सिद्धू यांना ही जागा सोडावी लागली होती. नाराज झालेल्या सिद्धूंनी जेटली यांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. मेरा पिंड या पंजाबी चित्रपटात त्यांनी अभिनय केला. २०१६२२ एप्रिलला भाजपने नवज्योत सिंग सिद्धूची खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती केली. पंजाब विधानसभा निवडणुकाजवळ आलेल्या असताना सिद्धूने १८ जुलैला तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा दिला. ते आम आदमी पक्षातर्फे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. कॉमेडी नाईटस विथ कपिल या लोकप्रिय कार्यक्रमात ते विनोदांन भरभरुन दाद देताना दिसतात.