coronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार?; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 05:32 PM2020-05-28T17:32:01+5:302020-05-28T18:11:34+5:30

लॉकडाऊन 5.0 वर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन पाचची घोषणाही करू शकतात.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन सरसकट शिथील होण्याची शक्यता धूसर आहे.

त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. लॉकडाऊन 5.0 वर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन पाचची घोषणाही करू शकतात.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या देशभरातील ११ शहरांमध्ये विशेष लक्ष देण्यात येण्याची शक्यता आहे.

या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई अगमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत शाळा उघडणे कठीण आहे. शाळा व महाविद्यालये 15 जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कालांतरानं राज्य सरकारे टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतील.

मोदी सरकारनं यापूर्वीच रेल्वे आणि देशांतर्गत उड्डाणे अंशतः सुरू केली आहेत. 1 जूनपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरू केली जाऊ शकते. पण आंतरराष्ट्रीय उड्डाण बंदच राहण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारकडून धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागू शकते.

धार्मिक स्थळी जत्रा किंवा महोत्सव यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही. त्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यासही परवानगी नसेल. तसेच मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अनिवार्य असेल.

लॉकडाऊन ५.० दरम्यान सर्व विभागातील सलून आणि जिम उघडण्यासाठी परवानगी असेल मात्र कंटेंनमेंट झोनमध्ये अशा प्रकारची कुठलीही परवानगी दिली जाणार नाही.

तसेच मॉल मल्टिप्लेक्स पण बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

. विवाह आणि अंत्यसंस्कारामध्ये काही जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.

Read in English