Lok Sabha Election Results - BJP lost 36 seats by a narrow margin
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला? By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 08:30 PM2024-06-06T20:30:27+5:302024-06-06T20:35:44+5:30Join usJoin usNext लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच राजकीय विश्लेषक आकडेमोड करण्यात व्यस्त आहेत. यावेळी भाजपाने स्वबळावर लोकसभेच्या २४० जागा जिंकल्या, तर एनडीएला २९३ जागा मिळाल्या. ५४३ सदस्यांच्या सभागृहात २७२ च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा ही २० जागा एनडीएकडे जास्त आहेत. २०१४ आणि २०१९ च्या तुलनेनं यंदा भाजपाच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. त्यावेळी पक्षाने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला होता. या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केल्यास जवळपास ३३ जागा अशा आहेत जिथे लढतीत निसटता पराभव भाजपाला सहन करावा लागला. या जागांवर भाजपाला अतिरिक्त ६,२६,३११ मते मिळाली असती, तर पक्ष स्वबळावर बहुमत मिळवण्यात यशस्वी होऊ शकला असता असं विश्लेषकांना वाटतं. चंदीगडमध्ये भाजपाचा २,५०४ मतांनी पराभव झाला, तर उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये केवळ २,६२९ मतांच्या फरकाने भाजपाला हार पत्करावी लागली. यूपीच्या सलेमपूरमध्ये भाजप उमेदवाराला ३,५७३ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, महाराष्ट्रातील धुळ्यात पक्षाचा अवघ्या ३,८३१ मतांनी पराभव झाला. यूपीच्या धौराहारामध्ये भाजपा उमेदवाराला ४,४४९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय आणखी काही जागा अशा होत्या, जिथे विजयाचे अंतर लोकसभेच्या तुलनेनं फार कमी होते. यामध्ये दक्षिण गोव्याच्या जागेचा समावेश आहे, जिथे भाजपचा १३, ५३५ मतांनी पराभव झाला. तिरुपती, आंध्र प्रदेशमध्ये १४,५६९ मतांनी गमावली, तर केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये १६,०७७ मतांनी पराभूत झाली. काही जागा अशा होत्या जिथे भाजपाच्या पराभवाचे अंतर थोडे जास्त होते. फतेहपूर, यूपीमध्ये पक्षाचा ३३,१९९ मतांनी पराभव झाला, तर खेरीमध्ये भाजपा उमेदवाराचा ३४,३२९ मतांनी पराभव झाला. एकूणच अशा जवळपास ३३ जागा आहेत, जिथे भाजपाच्या उमेदवाराला जवळच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने या जागांवर आपली रणनीती थोडी बदलण्याची गरज आहे, जेणेकरून काही मतांनी झालेल्या पराभवाचे विजयात रूपांतर करता येईल. एकूणच या निवडणुकीत भाजपाच्या जागांमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. काँग्रेसबद्दल बोलायचे तर त्यांच्या जागांमध्ये ९० टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी भाजपाने ४४१ जागांवर निवडणूक लढवली, तर काँग्रेसने ३२८ जागांवर उमेदवार उभे केले. भाजपाने विद्यमान खासदारांना उभे केलेल्या १६८ जागांपैकी पक्षाने १११ जागा जिंकल्या, जे एकूण जागांच्या ६६ टक्के आहे. दुसरीकडे, विद्यमान खासदारांना तिकीट न दिलेल्या १३२ जागांपैकी पक्षाने ९५ जागा जिंकल्या, म्हणजे एकूण जागांच्या ७२ टक्के. यावरून काही जागांवर उमेदवार बदलून सत्ताविरोधी भावना रोखण्यात पक्षाला यश आल्याचे दिसून येते. मात्र, संसदेत बहुमताचा आकडा कमी पडल्यामुळे भाजपाला नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांसारख्या मित्रपक्षांच्या इच्छेवर अवलंबून राहावे लागणार हे दिसून येते. महाराष्ट्रातही अमरावती नवनीत राणांचा २० हजार मतांनी पराभव झाला. बीडमध्ये ६,५०० हजार मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव झाला. तर मुंबईतील उज्ज्वल निकम यांना १६ हजार मताधिक्याने काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं. टॅग्स :भाजपाइंडिया आघाडीराष्ट्रीय लोकशाही आघाडीलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPINDIA Opposition AllianceNational Democratic Alliancelok sabha election 2024 Result