Lok Sabha elections 2024 How much does it cost per voter data provided by the Election Commission
लोकसभा: एका मतदारामागे किती खर्च येतो? निवडणूक आयोगाने सांगितली आकडेवारी By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:18 AM2024-04-19T10:18:14+5:302024-04-19T10:41:44+5:30Join usJoin usNext तब्बल ७५ पट महाग, निवडणूक आयोगाने प्रतिमतदार केलेल्या खर्चाचे आकडे १९५२ साली देशात लोकसभेची पहिली निवडणूक झाली, तेव्हा १७.३० कोटी मतदार होते आणि निवडणूक आयोगाचा एकूण खर्च होता १० कोटी ४० लाख रुपये. म्हणजे प्रत्येक मतदारामागे साधारण साठ पैसे. २०१४ साली ८३ कोटी ४० लाख मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ३८७० कोटी रुपये खर्च केले. म्हणजे प्रत्येक मतदारामागे ४६ रुपये ४० पैसे. एकूणच काळाच्या ओघात प्रत्येक मतदारामागे निवडणूक खर्चात तब्बल ७५ पटींनी वाढ झाली. २०१९ च्या निवडणुकीचा एकूण खर्च निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही, यात राजकीय पक्षांच्या खर्चाचा समावेश नाही. कोणत्या वर्षी एका मतदारामागे किती पैसे खर्च झाले? १९५२ - ६० पैसे, १९५७ - ३० पैसे, १९६२ - ३० पैसे, १९६७ - ४० पैसे, १९७१-१९७७ - ७० पैसे, १९८० - १.५० रूपये, १९८४-८५ - २ रूपये. १९८९ - मतदानासाठी वयाची पात्रता २१ वर्षावरून १८ वर्षे करण्यात आली. यावेळी एका मतदारामागे ३.१० रूपये एवढा खर्च झाला. १९९१-९२ - ७ रूपये, १९९६ - १०.१० रूपये, १९९८ - ११ रूपये, १९९९ - १५.३० रूपये, २००४ - १५.१० रूपये, २००९ - १५.५० रूपये, २०१४ - ४६.४० रूपये (एकूण खर्च ३,८७० कोटी, एकूण मतदार ८३.४ कोटी) देशाच्या पहिल्या निवडणुकीत एका मतदारामागे झालेल्या खर्चाच्या तुलनेत ७५ पटीने वाढ झाल्याचे दिसते. संदर्भ : निवडणूक आयोग आणि फिनशॉट्स टॅग्स :भारतीय निवडणूक आयोगनिवडणूकलोकसभा निवडणूक २०२४मतदानElection Commission of IndiaElectionlok sabha election 2024Voting