कुंभमेळ्यात हरवले-सापडल्याची कहाणी खरी ठरली, २०१६ हरवलेली महिला पाच वर्षांनी सापडली By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 12:28 PM 2021-04-09T12:28:36+5:30 2021-04-09T12:41:34+5:30
Missing woman found after five years : कुंभमेळ्यामध्ये आई आणि मुले, भाऊ-बहीणी, भाऊ-भाऊ हे हरवल्याची आणि नंतर अनेक वर्षांनी सापडल्याची गोष्ट तुम्ही अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून पाहिली असेलच. मात्र आता अशी प्रत्यक्षात घडलेली घटना समोर आली आहे. कुंभमेळ्यामध्ये आई आणि मुले, भाऊ-बहीणी, भाऊ-भाऊ हे हरवल्याची आणि नंतर अनेक वर्षांनी सापडल्याची गोष्ट तुम्ही अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून पाहिली असेलच. मात्र आता अशी प्रत्यक्षात घडलेली घटना समोर आली आहे.
उत्तराखंडमील ऋषिकेश येथून डोळ्यांत पाणी आणणारी ही घटना समोर आली आहे. एक वृद्ध महिला अयोध्या, मथुरा, वृंदावन, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ आणि केदारनाथची तीर्थयात्रा केल्यानंतर अर्धकुंभ मेळ्यासाठी हरिद्वार येथे पोहोचली होती. मात्र दुर्दैवाने ती घरी पोहोचू शकली नाही. तिच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र तिची काहीच माहिती समोर आली नाही.
त्यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांनी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जोगिया उदयपूर पोलीस ठाण्यात कृष्णा देवी ह्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र त्यानंतरही या महिलेचा शोध न लागल्याने कुटुंबीयांनी तिचा मृत्यू झाल्याचे गृहित धरले. मात्र पाच वर्षांनंतर जेव्हा ही महिला जिवंत असल्याचे आणि ती त्रिवेणी घाट ऋषिकेश येथे आहे हे समजल्यावर तिच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
सध्या हरिद्वार येथे कुंभमेळा सुरू आहे. त्यात पोलिसांकडून सर्व लोकांची ओळख तपासणी केली जात आहे. यादरम्यान पोलिसांना २०१६ मध्ये कुंभमेळ्यात हरवलेल्या कृष्णा देवी यांच्याबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जोगिया उदयपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. दरम्यान, कृष्णा देवी ह्या त्रिवेणी घाट ऋषिकेश येथे आहेत, हे समजल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना झालेला आनंद अवर्णनीय होता.
कृष्णा देवी यांचा मुलगा दिनेश्वर पाठक, पती ज्वाला प्रसाद, मुलगी उमा उपाध्याय ऋषिकेश येथे दाखल झाले. ऋषिकेशमध्ये आईला सुखरूप पाहून तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. महिलेची मुलगी आपल्या आईची गळाभेट घेऊन रडू लागली.