भारतातील आगळंवेगळं मंदिर, इथे नाही देवाची एकही मूर्ती, तरीही भेट देतात लाखो लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:53 AM2024-08-14T11:53:08+5:302024-08-14T11:57:38+5:30

Lotus Temple India: आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. इथे हजारो मंदिरं आहेत. तसेच या मंदिरांमधून देवाची नित्यनियमाने पूजा आर्चा होत असते. प्रत्येक मंदिराचं आपला असा खास इतिहास वैशिष्ट्य आहे. मात्र आपल्या देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाची एकही मूर्ती नाही. तरीही येथे हजारो लोक भेट देत असतात. आज जाणून घेऊयात या आगळ्यावेगळ्या मंदिराविषयी.

आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. इथे हजारो मंदिरं आहेत. तसेच या मंदिरांमधून देवाची नित्यनियमाने पूजा आर्चा होत असते. प्रत्येक मंदिराचं आपला असा खास इतिहास वैशिष्ट्य आहे. मात्र आपल्या देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाची एकही मूर्ती नाही. तरीही येथे हजारो लोक भेट देत असतात. आज जाणून घेऊयात या आगळ्यावेगळ्या मंदिराविषयी.

या आगळ्या वेगळ्या मंदिराचं नाव आहे लोटस टेंपल. हे मंदिर दिल्लीमध्ये आहे. हे मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर कुठल्याही धर्माशी संबंधित नाही. तर सर्व धर्माच्या लोकांसाठी खुलं आहे.

या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात कुठलेही धार्मिक विधी होत नाहीत. त्याऐवजी येथे विविध धर्मांच्या पवित्र ग्रंथांचं पठण केलं जातं. त्यामुळे हे मंदिर सर्व धर्मांसाठी समान स्थान बनलं आहे.

लोटस टेंपलचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्यपूर्ण असं बांधकाम आहे. हे मंदिर पांढऱ्या संगमरवरापासून बांधण्यात आलं आहे. तसेच हे मंदिर कमळाच्या फुलाप्रमाणे दिसतं. या मंदिराच्या २७ पाकळ्या आहेत. तसेच त्या तीन गटांमध्ये विभागलेल्या आहेत.

मंदिराचा मध्यवर्ती कळस हा ४० मीटर उंच आहे. तसेच त्याला ९ दरवाजे आहेत. मंदिराच्या आतमध्ये एक विस्तीर्ण असा प्रार्थना हॉलल आहे. त्यामध्ये एकाचवेळी २५०० लोक बसू शकतात.

दिल्लीमधील नेहरू प्लेसमधील हे मंदिर १९८६ मध्ये सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं. याचं बांधकाम प्रसिद्ध इराणी वास्तुविशारद फरिबर्ज सहबा यांनी केलं होतं. या मंदिराला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.