Lpg Gas Cylinder Accident Insurance Claim Process Information in Marathi
गॅस सिलेंडरमुळं दुर्घटना घडल्यास मिळते ५० लाखांपर्यंत मदत; फक्त करावं लागेल ‘हे’ काम By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:30 PM2021-09-29T12:30:52+5:302021-09-29T12:36:07+5:30Join usJoin usNext एक काळ होता गावातील अधिकाधिक महिला चुलीवर लाकडाच्या सहाय्याने जेवण बनवत होत्या परंतु आता जवळपास प्रत्येक घरात गॅस सिलेंडरची व्यवस्था झाली आहे. आता महिलांना जेवण बनवणं सहज सोप्प झालं आहे. परंतु हे सुविधायुक्त असलं तरी धोकादायकही आहे. जर तुम्ही गॅस सिलेंडरची आवश्यक ती काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तुम्ही ऐकलं असेल गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं काहींना जीव गमवावा लागला तर काहींच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित्येय गॅस सिलेंडरपासून एखादी दुर्घटना घडल्यास गॅस कंपनी इंश्युरन्सची सुविधा देते. होय, गॅस कंपनी घरगुती गॅस ग्राहकांना प्रत्येक सुविधा देते. ज्यात इंश्युरन्सचाही सहभाग असतो. घरगुती गॅस कंपनीचे ग्राहक असल्याने तुम्हाला मिळणाऱ्या सुविधांबद्दल पुरेशी माहिती असायला हवी. जेव्हा कधीही तुम्ही गॅस कनेक्शन घेता तेव्हा गॅस कंपनी तुम्हाला एक्सीडेंट कव्हर देते. ज्याबद्दल अनेक ग्राहकांना माहिती नाही. गॅस कनेक्शनसोबत तुम्हाला ग्राहक म्हणून पर्सनल एक्सींडेट कव्हर मिळते. मात्र माहिती नसल्याने अनेकजण या सुविधांपासून वंचित राहतात. जर सिलेंडरचा स्फोट झाला अथवा लीकेजमुळे आग लागली.मोठं नुकसान झालं तर ग्राहकाला ५० लाखापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. गॅस कंपनीसोबत इंश्युरन्स कंपन्यांचा करार असतो. ज्या अंतर्गत ग्राहकांना इंश्युरन्सची ही सुविधा दिली जाते. गॅसचा स्फोट अथवा लीकेज झाल्यानंतर आग लागली तर गॅस कंपन्यांना या दुर्घटनेसाठी जबाबदार धरलं जातं. नियमाप्रमाणे, प्रत्येक सिलेंडर पूर्णपणे सुरक्षित असावा, त्यात कुठल्याही प्रकारची कमतरता नसावी. त्याची संपूर्ण जबाबदारी डिलर आणि गॅस कंपन्यांकडे असते. गॅस सिलेंडरमुळे झालेल्या अपघातात एखादा मृत पावला अथवा जखमी झाला असेल तर त्याला आर्थिक मदत गॅस कंपन्यांकडून मिळते. प्रत्येक दुर्घटनेसाठी अधिकाधिक ५० लाख रुपये रक्कम दिली जाते. तर प्रतिव्यक्ती १० लाख रुपये देण्यात येतात. दुर्घटनेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर गॅस कंपन्यांकडून अधिकाधिक ५ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून संबंधित ग्राहकाला दिली जाते. त्याशिवाय दुर्घटनेनंतर तात्काळ मदत म्हणून प्रति व्यक्ती २५ हजार रुपये आर्थिक मदत गॅस कंपनीकडून करण्यात येते. दुर्घटनेत आग लागल्यानं अथवा स्फोट झाल्यानं घरातील काही नुकसान झाल्यास त्यासाठी १ लाख रुपये भरपाई गॅस कंपन्यांकडून देण्यात येते. घरगुती गॅस सिलेंडरमुळे कुठलीही दुर्घटना घडली अथवा काही हानी झाली तर त्याची जबाबदारी गॅस कंपन्यांवर असल्याने त्यांना मदत करावी लागते. इंश्युरन्स क्लेम करण्यासाठी ग्राहकाला दुर्घटनेनंतर तात्काळ गॅस डिलरला याबाबत माहिती कळवावी लागते. त्यासोबतच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाते. गॅस डिलरकडून घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट बनवला जातो. त्यानंतर आर्थिक मदतीसाठी कार्यवाही केली जाते. टॅग्स :गॅस सिलेंडरCylinder