तांत्रिक बिघाडामुळे पहिल्याच दिवशी लखनऊ मेट्रो ठप्प!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 18:07 IST2017-09-06T18:03:42+5:302017-09-06T18:07:54+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मेट्रोचे उद्घाटन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली.
मेट्रोच्या पहिल्याच फेरीच्यावेळी तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे मेट्रोत १०० हून प्रवासी तासाभरापेक्षाही अधिक काळ अडकून पडले होते. त्यांना नंतर आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आलं.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लखनऊ मेट्रोला हिरवा कंदील दाखवला.
ट्रान्सपोर्ट नगर ते चारबाग या दरम्यान साडेआठ किलोमीटर अंतरासाठी ही मेट्रो सुरु करण्यात आली असून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ही मेट्रो सुरु राहणार आहे.