३० दिवसांत ३ मोठी ग्रहणं दिसणार; चंद्रग्रहण पाहणे कितपत सुरक्षित?,जाणून घ्या वेळ आणि तारखा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 01:11 PM2020-06-03T13:11:52+5:302020-06-03T14:03:50+5:30

२०२० मध्ये एकून ६ वेळा ग्रहण लागणार आहेत. यातील तीन ग्रहण तीस दिवसांच्या आत म्हणजेच महिनाभरात लागणार आहेत. जुन ते जुलै दरम्यान एका पाठोपाठ एक तीन मोठी ग्रहणं लागणार आहेत. या ग्रहणांबाबत ज्योतीषांनी दिलेल्या तारखा आणि वेळेबाबत माहिती तुम्हाला देणार आहोत.

वर्षाचे पहिले चंद्रग्रहण १० जानेवारीला लागलं होतं. आता त्यानंतर ५ जूनला चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये सुद्धा दिसून येणार आहे.

५ जूनला लागणाऱ्या चंद्रग्रहणाची वेळ: या ग्रहणाचा आरंभ रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 जून ला रात्री २ वाजून ३४ मिनिटांनी हे चंद्रग्रहण संपणार आहे.

त्यानंतर १५ दिवसांनी म्हणजेच २१ जूनला चंद्र ग्रहण राहणार आहे. हे वर्षाचं तिसरं चंद्रग्रहण असेल. हे ग्रहण भारतासोबतच सौदी, दक्षिण पूर्वेकडील देशात आणि आशियात दिसण्याची शक्यता आहे.

२१ जुनला लागणाऱ्या ग्रहणाची वेळ : २१ जुनच्या लागणारे ग्रहण सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी २ वाजून २ मिनिटांपर्यंत असेल. या ग्रहणादरम्यान सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे.

त्यानंतर एका महिन्याने म्हणजेच ५ जुलैला तिसंर चंद्रग्रहण लागणार आहे. पण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसून अफ्रिका आणि अमेरिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कालावधीत देवी देवतांच्या मुर्तीला आणि फोटोंना हात लावू नये. खाण्याच्या वस्तूमध्ये तुळशीची पानं घालून ठेवावीत. चंद्रग्रहण पाहण्यासाठी चश्मा वापरण्याची आवश्यकता नाही. गरोदर महिलांना चंद्रग्रहणादरम्यान घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो.

सुर्यग्रहणाच्या तुलनेने चंद्र ग्रहण तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. त्यामुळे डोळ्यांवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. तेव्हा डोळ्यांना नुकसानकारक ठरेल असं वातावरण नसतं.

ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्र ग्रहण सुरू झाल्यानंतर अशुभ काळ सुरू होत असल्यामुळे या कालावधीत कोणतंही चांगलं काम करू नये. या कालावधीत काही गोष्टींबाबत काळजी घ्यायला हवी.