Mahatma Gandhi Death Anniversary : हजारोंच्या उपस्थितीत रामकुंडात अस्थींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 13:29 IST2019-01-30T13:06:34+5:302019-01-30T13:29:46+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे याच दिवशी हत्या करण्यात आली होती.

प्रार्थनेसाठी जाणाऱ्या महात्मा गांधीजींवर नथुराम गोडसेने तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातच गांधीजी गतप्राण झाले. आज महात्मा गांधींच्या हत्येला 70 वर्षे होत आहेत.

नाशिकमधील गोदावरीच्या पात्रातील पवित्र रामकुंडावर 12 फेब्रुवारी 1948 साली महात्मा गांधींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते.

हे क्षण त्यावेळी कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आले होते. (फोटो - वी. एस. देसाई)