Mahatma Gandhi Death Anniversary do you know these things about mahatma gandhi
Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:08 AM2019-01-30T11:08:04+5:302019-01-30T11:35:55+5:30Join usJoin usNext महात्मा गांधींची आज 71वी पुण्यतिथी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत माहीत नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया. 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली होती. गांधीजींनी 1899 मध्ये बोअर युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सेवा केली. याच युद्धाची भीषणता पाहून त्यांनी 'अहिंसे'चा मार्ग स्वीकारला होता. गांधीजींमुळे चार महाद्विपं आणि 12 देशांमध्ये नागरिक हक्क चळवळ घडून आली. गांधीजींना अद्याप शांततेचं नोबेल मिळालेलं नाही, पण तब्बल पाच वेळा या सन्मानासाठी नामांकन मिळाले होते. ब्रिटननेही गांधीजींच्या निधनानंतर 21 वर्षांनी टपाल काढून त्यांचा गौरव केला होता. भारतातील 53 आणि परदेशातील 48 प्रमुख मार्ग महात्मा गांधींच्या नावाने ओळखले जातात. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण तीन फुटबॉल क्लब स्थापन करण्यास मदत केली होती. महात्मा गांधी त्यांच्या आयुष्यात तब्बल रोज 18 किमी चालले. एवढं अंतर पूर्ण जग फिरण्याच्या दुप्पट होते. स्वातंत्र्य साजरं करण्यासाठी झालेल्या पंडित नेहरुंच्या भाषणावेळी गांधीजी उपस्थित नव्हते.टॅग्स :महात्मा गांधीMahatma Gandhi