#MahavirJayanti2018: teachings and qoutes of Mahaveer
#MahavirJayanti2018 : जाणून घ्या 'विश्वाचा स्वर्ग' करणाऱ्या महावीरांच्या 'या' शिकवणी By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 11:18 AM2018-03-29T11:18:46+5:302018-03-29T11:18:46+5:30Join usJoin usNext मुंबई : महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. २४वे आणि शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त हा सण साजरा करण्यात येतो. जैन धर्मातील मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला होता. अहिंसा आणि क्षमाशीलता ही महावीरांची मुख्य शिकवण होती. जाणून घेऊ या त्यांच्या अन्य शिकवणी... क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावं. आत्मविश्वास हे संरक्षणाचे साधन आहे. ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो. दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो. परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे. बुद्धिमंतांनी इतरांचा तिरस्कार करू नये. मनुष्य योग्य प्रयत्नांनी सर्व काही साध्य करू शकतो.टॅग्स :महावीर जयंती २०१८भारतीय परंपराभारतीय सणMahavir Jayanti 2018Indian TraditionsIndian Festivals