Makar Sankranti Special Gujarat Harvest festival of Uttarayan was celebrated in the state
Makar Sankranti Special : काय पो छे! आकाशात रंगली पतंगबाजी By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 03:30 PM2020-01-15T15:30:58+5:302020-01-15T15:49:26+5:30Join usJoin usNext नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. मोठ्या उत्साहात भारतात मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. गुजरातमध्ये 'उत्तरायण' म्हणजे मकरसंक्रांत धूमधडाक्यात साजरी केली जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये पतंग उडवली जाते. पतंगबाजीत अनेकांच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचा कस लागतो. उत्तरायणाच्या दिवशी रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सुंदर दिसले. गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. गुजरातमध्ये बरेच दिवस आधीच पतंगबाजी उत्सवाला सुरुवात होते. आकाशातील विविध आकाराचे आकर्षक पतंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. अमित शहा यांनी मंगळवारी अहमदाबादमध्ये आयोजित 'उत्तरायण' कार्यक्रमात सहभाग घेतला होता. अमित शहा यांना देखील पतंग उडविण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी देखील पतंग उडवली. गुजरातमध्ये अनेकांच्या घरात संक्रांतीच्या दिवशी उंधियो हा पदार्थ बनवला जातो. तसेच अनेकांच्या घरात जिलेबीची मेजवाणी असते.टॅग्स :मकर संक्रांतीगुजरातMakar SankrantiGujarat