769 रुपयांत करा विमान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 18:37 IST2018-01-22T18:35:07+5:302018-01-22T18:37:55+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं स्पाइस जेट या विमान कंपनीनं प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे.

स्पाइस जेटनं प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत देऊ केली असून, ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या नावानं ही ऑफर प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

ज्यात देशांतर्गत प्रवासासाठी 769 रुपयांपासून तिकीट मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तुम्हाला 2469 रुपये मोजावे लागणार आहेत.

ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या अंतर्गत 22 ते 25 जानेवारीपर्यंत 12 डिसेंबर 2018 पर्यंत ट्रॅव्हल्स पीरियड असणार आहे.

देशांतर्गत प्रवाशांना चांगाल प्रवास देण्यासाठी स्पाइस जेट ही भारतातली तिसरी सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी आहे.