पावसाळी पिकनिक करायचीय, देशातील या ठिकाणांना नक्की भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 17:04 IST2018-07-02T17:00:14+5:302018-07-02T17:04:02+5:30

पावसाळ्यात कर्नाटकातील जॉग फॉल हा धबधबा पाहण्यासारखा असतो. शरावती नदीचं वाहत आलेलं पाणीच या धबधब्याला जाऊन मिळतं.

केरळमधलं कोची, कोवलम, कोझिकोडे ही ठिकाणं नयनरम्य आहेत. निसर्गानं केरळला भरभरून सौंदर्य बहाल केलं आहे.

पावसाळी वातावरणात खंडाळ्याचं सौंदर्य विलोभनीय भासतं. डोंगर द-यांतून कोसळणारे धबधबे लक्ष वेधून घेत असतात.

मेघालयमधल्या शिलाँगला पूर्व स्कॉटलंड म्हणूनही ओळखलं जातं. इथे स्कॉटलंडसारख्या डोंगरद-यांमधून वाहणा-या नद्या सदोदित आपलंसं करतात.

अरुणाचलमधील तवांगही पर्यटकांना नेहमीच खुणावतं. इथे तुम्ही मनमुराद फोटो काढू शकता.

उत्तराखंडातही पावसाळ्यात नयनरम्य वातावरण असतं. पावसाळी वातावरणात हिरव्यागार फुलांनी उत्तराखंड बहरलेलं असतं.

टॅग्स :प्रवासTravel