Manohar Parrikar: जयंती विशेष : ...तेव्हा मुंडे-महाजनांनी दिली पर्रीकरांना उमेदवारी By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:18 AM 2022-12-13T10:18:12+5:30 2022-12-13T10:34:53+5:30
गोव्याचे माजी मुखमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज जयंती. गोव्याच्या विकासात आणि देशाच्या सैन्य दलासाठीचे त्यांचे योगदान कायम स्मरणीय आहे. गोव्याचे माजी मुखमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज जयंती. गोव्याच्या विकासात आणि देशाच्या सैन्य दलासाठीचे त्यांचे योगदान कायम स्मरणीय आहे.
गोव्याचे चारवेळा मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेले राजकारणातील एक उच्च शिक्षित व्यक्तीमत्व म्हणजे मनोहर पर्रीकर. १७ मार्च २०१९ रोजी त्यांचे दुर्धर आजाराने निधन झाले.
मराठी भाषेतून माध्यमिक शिक्षण घेतलेल्या पर्रीकर यांनी 1978 साली आयआयटी मुंबई येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. आयआयटी या देशातील अग्रगण्य संस्थेमधून पास होऊन राजकारणात आलेले मनोहर पर्रीकर हे देशातील पहिले आमदार होते.
१९९० च्या दशकात प्रारंभी स्वर्गीय मनोहर पर्रीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करायचे. संजय वालावलकर यांच्यासारख्या म्हापसा शहरातील मित्रांनी त्यांना बालपणी संघाच्या शाखेवर नेले होते. संघ संस्कार तेथूनच सुरू झाले.
अयोध्येत राममंदिर व्हायला हवे म्हणून ९० च्या दशकात गोव्यातूनही अयोध्येला कारसेवेमध्ये जे स्वयंसेवक गेले होते, त्यात पर्रीकर हेही होते. पर्रीकर यांची आई देखील होती.
संघाचे काम करत असताना आपण कधी राजकारणात पोहचेन, असे पर्रीकर यांना वाटले नव्हते. मात्र ते नंतर संघाच्या आग्रहास्तव राजकारणात पोहचले. १९८९ सालापासून स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्व. गोपिनाथ मुंडे हे गोव्यात भाजपचे काम वाढविण्यासाठी येत होते.
काँग्रेस पक्ष तेव्हा सत्तेत होता व मगो पक्ष प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका वठवत होता. महाराष्ट्रवादी गोमंतक म्हणजेच मगो पक्ष हा प्रामुख्याने हिंदू मतदारांचे प्रतिनिधित्व करत होता. त्यातही हिंदू बहुजन समाजाचे मतदार हे मगोपचे हक्काचे होते.
भाजपला गोव्यात मोठे करण्यासाठी मगोपशी युती करावी लागेल. हे करून भाजपची वाढ होईल हे महाजन व मुंडे यांनी ओळखले होते. मगो पक्षाच्या तिकिटावर निवडून येणारे आमदार फुटतात व मग काँग्रेसमध्ये जातात आणि शेवटी काँग्रेस पक्षच सत्ते राहतो ही स्थितीही बदलायची असा विचार महाजन, मुंडे वगैरे पर्रीकर, श्रीपाद नाईक यांच्याकडे व्यक्त करत होते.
भाजप-मगो युती १९९४ साली फळाला आली पण तत्पूर्वी १९९१ साली लोकसभा निवडणूक झाली होती. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात ९१ साली भाजपसाठी उमेदवार शोधण्यास प्रमोद महाजन यांनी पर्रीकर यांना सांगितले होते.
पर्रीकर यांनी अनेकांशी बोलणी केली. मात्र भाजपचे तिकीट स्वीकारणे म्हणजे हमखास पराभूत होणे किंवा डिपॉझिट गमावून बसणे अशी स्थिती त्यावेळी होती. त्यामुळे पर्रीकर यांनी प्रयत्न करूनही उमेदवार सापडला नाही.
शेवटी महाजन यांनी तुम्हीच तिकीट स्वीकारा असे पर्रीकर यांना सांगून आश्चर्याचा धक्का दिला. पर्रीकर यांना निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरण्यासाठी घरच्या मंडळींची मंजुरी नव्हती.
तुम्ही जिंकला तर मी माझी कार कायमची तुम्हांलाच देऊन टाकेन, असे पर्रीकर यांच्या एका शेजाऱ्याने त्यावेळी मुद्दाम चेष्टेने नमूद केले होते. पर्रीकर यांनी काहीवेळा जाहीर सभांमधून हा किस्सा सांगितलेला आहे.