नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी केला योग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 04:21 PM2018-06-21T16:21:15+5:302018-06-21T16:21:15+5:30

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशातील विविध भागात योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी योगसाधना केली.

गुवाहटी येथे संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी योग केला.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथील राजभवन परिसरात आयोजित योग शिबिरात योगासने केली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा लखनऊ येथील राजभवन परिसरात योग केला.

पटनामध्ये केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी योग केला.

रांची येथे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी योगसाधना केली.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सुद्धा अमरावती येथील आयोजित योग शिबिरात सहका-यांसोबत योगसाधना केली.