म्हणून आमदाराने मास्क घालून केला केरळ विधानसभेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 20:27 IST2018-06-04T20:27:49+5:302018-06-04T20:27:49+5:30

केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीगचे आमदार परक्कल अब्दुल्ला यांनी सोमवारी चक्क मास्क आणि हातमोजे परिधान करून केरळ विधानसभेत प्रवेश केला.
कुटिडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परक्कल अब्दुल्ला यांनी कोझिकोडे जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या निपाह व्हायरसबाबतचे गांभीर्य सभागृहासमोर आणण्यासाठी मास्क लावून विधिमंडळात प्रवेश केला.
आमदार परक्कल अब्दुल्ला यांची ही कृती केरळ विधानसभेत लक्षवेधी ठरली.
वटवाघुळांमार्फत फैलावणाऱ्या निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आजाराचा धोका अद्याप कायम आहे.