मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 10:55 AM 2020-08-07T10:55:15+5:30 2020-08-07T12:24:08+5:30
सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 चा निकाल जाहीर होताच राजस्थानमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. ज्या तरुणीला टॉपची मॉडेल म्हणून लोक ओळखत होते तिचे नाव 4 ऑगस्टला लागलेल्या निकालामध्ये आले होते. युपीएससी परिक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. अनेकांनी घरच्या परिस्थितीवर मात करून आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र, या यादीमध्ये अशी एक तरुणी आहे जिने मॉडेलिंगचा झगमगाट सोडून आयएएस झाली आहे.
सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 चा निकाल जाहीर होताच राजस्थानमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली. ज्या तरुणीला टॉपची मॉडेल म्हणून लोक ओळखत होते तिचे नाव 4 ऑगस्टला लागलेल्या निकालामध्ये आले होते.
ही मॉडेल होती ऐश्वर्या श्योराण (Aishwarya Sheoran). ऐश्वर्या आता भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होणार आहे. तिने या यादीमध्ये 93 वी रँक मिळविली आहे. ऐश्वर्या ही मूळची राजस्थानची आहे.
ऐश्वर्या श्योराणचे वय हे अवघे 23 वर्षांचे आहे. राजस्थानच्या चुरु जिल्हायात्या राजगडमधील चुबकिया ताल गावात तिचे घर आहे. ऐश्वर्याच्या या यशाने गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ऐश्वर्या या नावाची कहाणीदेखील तेवढीच मजेदार आहे. ऐश्वर्या राय वरून तिच्या आईने मुलीचे नाव ऐश्वर्या ठेवले होते. कारण ती देखील मिस इंडिया बनावी अशी या आयएएस ऐश्वर्याच्या आईची इच्छा होती.
महत्वाचे म्हणजे या मॉडेलने मिस इंडिया स्पर्धेसाठी तयारी केली. तिची अखेरच्या 21 जणांमध्ये निवडही झाली होती. पण मिस इंडियाचा खिताब हुकला होता. मॉडेल ऐश्वर्याचे युपीएससी परीक्षा क्रॅक करण्याचे स्वप्न होते. यामुळे तिने 2017 मध्ये मॉडेलिंग सोडले व परिक्षेची तयारी सुरु केली.
ऐश्वर्या अभ्यासात हुशार होती. यामुळे तिने युपीएससीसाठी कोणताही क्लास लावला नाही. यासाठी तिने मोबाईल, सोशल मिडीया आणि आवडते छंद बंद करावे लागले. याचे फलस्वरुप मी आयएएस झाले, असे ती म्हणते.
ऐश्वर्याने दिल्लीच्या श्री राम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. ती सायन्सची विद्यार्थीनी आहे. तिने UPSCसाठी वडिलांची मदत घेतली होती.
1997 मध्ये जन्मलेली ऐश्वर्या आता महिला सशक्तिकरण आणि वंचितांसाठी काम करू इच्छित आहे. ऐश्वर्याला राजस्थानमध्येच काम करायचे आहे. तिला आयएएस किंवा आयएफएसची पोस्ट मिळण्याची शक्यता आहे.
तिच्या या यशावर तिने आयएएस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना एक संदेश दिला आहे. जर तुम्ही जिवनात काही मिळवू इच्छित असाल तर त्यासाठी मेहनत करावी लागेल. बिना मेहनत काहीच मिळणार नाही, असे ती म्हणाली.