Model Tenancy Act: दोन महिन्यांचे भाडे थकले तर...; जाणून घ्या घरमालकाला कोणते मिळणार अधिकार By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:32 PM 2021-06-03T12:32:48+5:30 2021-06-03T12:43:11+5:30
Model Tenancy Act owners Rights when tenants did no follow rules or not given two months rent: नव्या कायद्यानुसार टेनन्सी अॅक्ट (Model Tenancy Act) घर मालक आणि भाडेकरुमधील मतभेद कमी केले जाणार आहेत. तसेच अनेक रिकामी घरे आता भाड्याने देता याणार आहेत. यामुळे घरांची कमतरता दूर होणार आहे. बिझनेसही वाढीस लागणार आहे. जाणून घ्या काय बदल होणार... मोदी सरकारने मॉडेल टेनन्सी अॅक्ट (Model Tenancy Act) मसुद्याला परवानगी दिली आहे. आदर्श भाडेकरार कायद्याचा हा मसुदा आता राज्यांना पाठविला जाणार आहे. यानंतर यामध्ये सुचविलेले बदल करून तो देशभर लागू केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत याला मंजुरी दिली आहे. (New Model Tenancy Act, what about tenants not gave rent for two months. )
या नव्या कायद्यानुसार टेनन्सी अॅक्ट (Model Tenancy Act) घर मालक आणि भाडेकरुमधील मतभेद कमी केले जाणार आहेत. तसेच अनेक रिकामी घरे आता भाड्याने देता याणार आहेत. यामुळे घरांची कमतरता दूर होणार आहे. बिझनेसही वाढीस लागणार आहे.
नव्या Model Tenancy Act मध्ये जर भाडेकरूने दोन महिने भाडे दिले नाही कर घरमालक त्याच्याकडून घर खाली करून घेऊ शकतो. (New Model Tenancy Act oweners Rights)
घर रिपेअर करायचे असेल तर... Model Tenancy Act नुसार जर मालकाला घर दुरुस्ती किंवा पाहणी करयाची असेल किंवा अन्य कोणत्याही उद्देशाने यायचे असेल तर 24 तास आधी लिखित नोटीस भाडेकरूला द्यावी लागणार आहे. (before 24 hours notice)
भाडेकरूला कधी काढता येणार... रेंट अॅग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या वेळेआधी भाडेकरूला काढण्यासाठी दोन अटी आहेत. एकतर भाडेकरूने दोन महिन्यांचे भाडे थकविले असेल किंवा तो घराचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असेल, तरच त्याला मुदत संपण्याआधी घरातून बाहेर काढता येणार आहे.
सिक्युरिटी डिपॉझिट किती? (How nuch security deposite in new Tenancy Act) भाड्याने घर घेताना सिक्युरिटी डिपॉझिटवरून देखील वाद होतो. नव्या कायद्यानुसार घरासाठी अधिकाधिक दोन महिन्यांचे भाडे अनामत रक्कम म्हणून घ्यावे लागणार आहे. तर नॉन रेसिडेंशियल म्हणजेच दुकाने, वेअरहाऊस किंवा अन्य जागांसाठी सहा महिन्यांचे भाडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेता येणार आहे.
जागा खाली करण्याची तरतूद.... घर किंवा दुकान रिकामे करण्यासाठी मालकाने भाडे करारातील सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, तरीदेखील भाडेकरू ते खाली करत नसेल तर मालक दोन महिन्यांसाठी दुप्पट भाडे वसूल करू शकतो.
तर दुप्पट, चौपट भाडे वसूल करता येणार....जाणून घ्या नवा नियम काय सांगतो दोन महिन्यांनी देखील रिकामे केले नाही, तर पुढील दोन महिने चौपट भाडे करू शकतो. यासाठी मालकाला जागा खाली करण्यास सांगण्याआधी नोटीस देणे बंधनकारक आहे. नोटीस दिल्यानंतर लिखित किंवा मेल, मेसेजद्वारे एक दिवसानंतर भाडेकरूला याची कल्पना द्यावी.
भाडेकरूला काय फायदा... भाडेकरू कोणत्याही मालमत्तेवर कब्जा करू शकत नाही. घर मालकही भाडेकरूला त्रास देऊन घर खाली करून घेऊ शकत नाही. यासाठी गरजेचे नियम बनविण्यात आले आहेत. भाडेकरू ज्या मालमत्तेमध्ये राहत आहे, त्याला त्या मालमत्तेची देखभाल करावी लागणार आहे.
रेंट अॅग्रीमेंट कसे बनवाल... (Rent agreement clause in new Tenancy Act) घरमालक आणि भाडेकरूमध्ये जर काही वाद झाला तर त्याची सुनावणी रेंट अथॉरिटी (Rent Authority) मध्ये होईल. महत्वाचे म्हणजे रेंट अॅग्रीमेंट हे घरमालकाने आणि भाडेकरूने स्वत: हजर राहून रेंट अथॉरिटीसमोर बनवावे लागणार आहे. जर ते शक्य नसेल तर रेंट अॅग्रीमेंट बनविल्याच्या दोन महिन्यांत रेंट अथॉरिटीला याची प्रत आणि माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी रेंट अथॉरिटी बनविली जाणार आहे.