वाराणसीत मोदींचे जोरदार शक्तिप्रदर्शन, गंगा आरतीत घेतला सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 21:13 IST2019-04-25T21:05:36+5:302019-04-25T21:13:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आज मोदींनी वाराणसी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोदींच्या रोड शोची सुरुवात झाली.

मोदींच्या रोड शोसाठी वाराणसीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सुमारे सात किलोमीटरच्या रोड शोच्या माध्यमातून मोदी आणि भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

रोड शो समाप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी गंगा आरतीला उपस्थिती लावत गंगा आरती केली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

गंगा आरतीसाठी वाराणसीतील घाटांवर करण्यात आलेली आकर्षक सजावट