भारतातले सर्वात खतरनाक रेल्वे रूट, पण प्रवासात येतो सुंदर अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 23:11 IST2018-07-11T23:01:05+5:302018-07-11T23:11:32+5:30

चेन्नई-रामेश्वरम हा रेल्वे मार्ग हा भारतीय अभियंत्यांच्या कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना आहे. चहूबाजूंनी वेढलेल्या समुद्रातून जाणा-या या मार्गावरून प्रवास केल्यानंतर निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याची अनुभूती येते.
मांडवी एक्स्प्रेसनं मुंबई ते गोवा असा प्रवास केल्यानंतर या मार्गात तुम्हाला निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळतं. डोंगरातून खळाळून वाहणारा धबधबा, सगळीकडे असलेली हिरवळीची तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता.
कालका हे भारतातील सर्वात प्रसिद्ध रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे. टॉय ट्रेननं कालका ते शिमला प्रवासादरम्यान विहंगावलोकन केल्यावर निसर्गाचं मनोहारी दृश्य नजरेस पडतं.
नवी दिल्लीहून आग्रा आणि पुन्हा नवी दिल्लीला येणारी महाराजा एक्स्प्रेस ही शाही ट्रेन समजली जाते. 2010मध्ये भारतीय रेल्वे प्रवासनानं या ट्रेनची सुरुवात केली. ट्रेनमध्ये पर्यटकांना सर्व सुखसुविधा दिल्या जातात.
टॉय ट्रेननं न्यू जलपाई गुडी ते दार्जिलिंगचा केलेला प्रवासही अविस्मरणीय ठरू शकतो. या ट्रेनमधून प्रवास करत असताना आजूबाजूला पसरलेले चहाचे मळे तुमचं लक्ष वेधून घेत असतात.